नारी शक्ति को समर्पित "रचना पर्व"
नारी शक्ति को समर्पित "रचना पर्व"
शेप सुमित्रा गोरखनाथ - “स्त्री जन्मा तुझी कहाणी”
कुटुंब व्यवस्थेचा कणा म्हणजे कुटुंबातील स्त्री आपल्या भारतीय व्यवस्थेला सुमारे ५००० वर्षाचा इतिहास आहे. तेव्हापासूनच आपल्या व्यवस्थेत पुरुषांना स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ ठरवूंन त्यांना अनेक हक्क बहाल केले आहेत. जर तुम्हाला असे वाटत असेल की, काळ बदलला आहे. आणि 21 व्या शतकातील महिलांचे जीवन देखील बदललेले आहे. तर तुम्ही चुकीचे आहात कारण असे काहीही झालेले नाही. खरे तर ,मला वाटते की परिस्थिती आणखीन वाईट झाली आहे. स्त्रीवाद वाढत आहे. असे म्हटले जाते आणि मुली प्रत्येक बाबतीत मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत असल्याचे दाखवले जाते मोबाईल स्क्रीन पेक्षा वाचतो खूपच वेगळे आहे.
आपण ही एक स्त्री असल्यामुळे आपण कोणत्या परिस्थितीतून जातो, हे महिलांशिवाय इतर कोणालाही समजू शकत नाही. आपल्या समाजात मुलींना नेहमीच उपभोगाची वस्तू ,करमणुकीचे साधन समजले जाते. आणि तरीही या परिस्थितीत काहीही फरक पडत नाही. स्त्रियांच्या विचारसरणीत काही बदल झाले असतील पण, पुरुषांच्या विचारसरणीत आणि दृष्टिकोनात फारसा फरक नाही. तरीही दैनंदिन जीवनातील काही अतिशय सामान्य दिसणारे कामे स्त्रियांसाठी पर्वत चढण्याइतकी अवघड असतात.
रस्त्यावर चालणे, सार्वजनिक वाहतुकीवर प्रवास ,तुमचे आवडते कपडे घालणे, अंधारानंतर बाहेर राहणे ,कॅब मधून एकट्याने प्रवास करणे, जीवनात नोकरी मिळवणे, एखाद्यावर विश्वास ठेवणे ,सोशल मीडियावर फोटो शेअर करणे.
प्रेम ही उदात्त भावना बाजूलाच राहते. आणि वासनेचा बाजार सुरू होतो. अशात बहुतांशी वेळा मुलीच बळी ठरतात. महिलांना आजच्या युगात दिले जाणारे स्थान हे खालच्या पातळीचे आहे. परंतु आत्ता सरकारने केलेले कायदे हे फार महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. प्रत्येक जण म्हणतो की, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार दिले गेले पाहिजे. त्यांचे हक्क प्रदान केले पाहिजेत. पण खरे पाहिले असता पुरुषप्रधान संस्कृतीत मात्र महिलांना दुय्यम स्थान आजही दिले जात असलेले दिसून येते
आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मास आली की घरात व्यवस्थित मिळत नसल्याचे दिसते. ही स्त्री आज पुरुषाच्या खांद्यास खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत असतानाही तिला आजही पुरुषी अहंपणाचा सामना करावा लागतोय .असे म्हटले जाते की स्त्रियांना आणि पुरुषांना समान हक्क आहे, पण नेहमी स्त्रियांना दुय्यम हक्क मिळतो. जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो .मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे ,ती पत्नी आहे, ती मुलगी आहे ,ती माया आहे ,ती सुरुवात आहे ,आणि तीच नसेल तर सारे काही व्यर्थ आहे. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्ये, स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तुत्व, स्त्री म्हणजे वास्तव्य ,अशा महान स्त्री जातीला माझा कोटी कोटी विनम्र अभिवादन.
- प्रा. शेप सुमित्रा गोरखनाथ
मो.नं.9970956775
अस्वीकरण (Disclaimer): इस लेख/कविता/रचना में व्यक्त किए गए विचार लेखक के अपने हैं और उनकी व्यक्तिगत दृष्टि को दर्शाते हैं। ये विचार स्मिता नागरी लिपि साहित्य संगम/शोध निरंजना के संपादक अथवा संपादकीय मंडल के सदस्यों या उनके विचारों का प्रतिनिधित्व नहीं करते।